मल्हारगड
पुण्यापासून अंदाजे २० किमी अंतर. पुण्याहून सासवड ला जाताना दिवेघाट संपताच डाव्या बाजूला झेंडेवाडी फाटा लागतो. झेंडेवाडी गावातून गडाचे अंतर अंदाजे ५ ६ किमी आहे. झेंडेवाडी गावातून पुढे एक खिंड ओलांडली कि नजरेत भरतो मल्हारगड. तिथूनच डोंगर न उतरता गडाकडे आपण कूच करु लागलो कि आपण टॉवरच्या बाजूने गडाच्या मुख्य दरवाजा पाशी पोहोचू शकतो. सासवड पासून अलीकडे ६ किमी अंतरावर सोनोरी गाव आहे. दिवे घाटातून सासवड कडे जाताना अंदाजे १ किमी अंतरावर डावीकडे मल्हारगड कडे जाण्यासाठी पाटी लावलेली आहे. डावीकडे आतमध्ये गेलो की सरळ जाणारा रस्ता सोनोरी गावाकडे जातो. तिथून अंदाजे २ किमी अंतरावर मल्हारगड नजरेस पडतो. या गावातच भिवराव व कृष्णराव पानसे यांचा वाडा आहे. सहा बुरुंज व मजबूत तटबंदी असलेला हा वाडा ऐतिहासिक वारसा जपत अजूनही दिमाखात उभा आहे. वाड्यामध्ये श्री गणेश व श्री विष्णूचे मंदिर आहे. वाड्यामध्ये बघण्यासारखे जुन्याकाळातले लाकडी दरवाजे, उत्कृष्ट नक्षीकाम असलेल्या खिडक्या, विहीर तसेच अष्टकोनी हत्ती तलाव पाहण्यासारखे आहेत. तर गावामध्ये श्रीकृष्णाचे सुंदर कोरीव काम असलेले सुबक मंदिर आहे. रस्ता कच्चा असल्याने गावातून गडावर जायला २० २५ मिनिटं लागतात. या बाजूनेही आपण गडाच्या मुख्य दरवाजाने गडावर पोहोचू शकतो.
दिवे घाट संपल्यानंतर मल्हारगड फलक डाव्या बाजूला १ किमी अंतरावर आहे. डाव्या बाजूला वळून रस्त्याने थोडंसं पुढे गेलो की पुन्हा डाव्या बाजूला मल्हारगड म्हणून फलक दिसतो. कच्च्या रस्त्याने अंदाजे पाच किमी अंतर गेल्यावर आपण गडाच्या चोर दरवाजाच्या पायथ्याशी पोहोचतो.
रस्त्याचे काम सध्या चालू आहे दुचाकी जाऊ शकते. चार चाकी गाडीने या रस्त्याने नाही जाऊ शकत. त्यासाठी सोनोरी गावातून किंवा झेंडेवाडी गावातून जाऊ शकतो. इथून दहा पंधरा मिनीट्स मध्यावर चढून गेलो कि चोर दरवाजाच्या पायथ्याशी गडाचा नकाशा दर्शक फलक आहे. गडावर काय काय पाहण्यासाठी आहे वगैरे सर्व माहिती आपण इथून घेऊ शकतो. इथून आपणास अजून दहा पंधरा मिनिट्स वर चढून जावं लागतं. चोर दरवाजामधून आत जाता येत. बुरुंजाची अर्धी अधिक पडझड झालेली आहे. बुरुंजावर उभे राहून सासवड कडे पाहिलं की आपणास पुरंदर नजरेस पडतो. चोर दरवाजा मधून आतमध्ये गेलो की समोरच स्वराज्याचे भगवे निशाण वाऱ्यावर डौलाने फडकताना दिसते. अन त्या बरोबरच आतील वाड्याची भव्य तटबंदी नजरेत भरते. तसच थोडं पूर्वेकडे चालत गेलो की डाव्याहाताला सुबक बांधणीची आणि पायऱ्यांची विहीर दिसते. आजूलाबाजूला पिवळ्या फुलांची झाडे विहिरीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. वापरात नसल्याने विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच समोर गडाच्या तटबंदीच्या डाव्या बाजूने चालत गेलो की आपण गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचतो. आजही सुस्थितीमध्ये असलेले गडाचे प्रवेशद्वार इतिहास कालीन बांधकामाची अन त्याच्या भव्यदिव्यतेची साक्ष देत राहतो. प्रवेशद्वाराच्या बुरुजावर उंच असा भगवा निरभ्र आकाशामध्ये दिमाखात फडकत असलेला आपणास दिसतो. त्याचबरोबर सभोवतालचा विलोभनीय नयनरम्य परिसर डोळ्यांचं पारणं फेडतो. डावीकडे झेंडेवाडी गाव तर उजव्या बाजूला सोनोरी गाव वसलेले आहे. या प्रवेशद्वाराला सोनोरीद्वार असेही म्हणतात. पुन्हा माघारी वळल्यावर समोर एक चौथरा दिसतो अन बाजूलाच आणखी एक भगवा फडकताना. आतल्या वाड्याचे प्रवेशद्वार उजव्या बाजूला नजरेस पडते. त्या दिशेने सरळ चालत गेल्यास आपण वाड्याच्या तटबंदीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो, यालाच महादरवाजा असेही म्हणतात. प्रवेशद्वारासमोर काहीही तटबंदी नाही, तसेच खाली खोल दरीही आहे त्यामुळे इथे फोटो घेणे तसे धोक्याचेच. समोरच सोनोरी गावाचा परिसर दिसतो. प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यास समोरच डावीकडे शिवशंकराचे सावळेश्वराचे तर उजवीकडे श्री खंडोबाचे मंदिर आहे. शंकराच्या मंदिरामध्ये खूपच सुंदर असे शिवलिंग आहे तर समोरील भिंतीवर उजव्या बाजूवर शिवछत्रपतींच्या मूळ चित्राची तसबीर नजरेस पडते. आपसूकच आपला हात "मुजरा राजं.." असे म्हणत वर येतो अन आपली मान कधी लवते कळतंच नाही. खंडोबाचे दर्शन घेऊन आपण मागच्या बाजूने सरळ चालत गेलो की उजव्या बाजूला बालेकिल्ल्याचा चौथरा दिसतो. तिथून पुढे उजवीकडे गेल्यास दिवेघाट अन पुण्याचा परिसर आपणास दिसतो. तसेच माघारी दक्षिणेकडे तटबंदीच्या बाजूने चालत येत आपण पुन्हा चोर दरवाजा पाशी पोहोचतो. अशाप्रकारे आपण अर्ध्यापाऊन तासामध्ये पूर्ण गडाचा फेरफटका मारू शकतो.
गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे सोनोरीद्वारापाशी असलेल्या एका माहिती फलकानुसार गडाची बांधणी १७६३ ते १७६५ च्या काळामध्ये केली गेली. पेशव्यांच्या तोफखाण्याचे प्रमुख असलेले भिवराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी पुण्यापासून सासवडच्या मार्गावर देखरेख करण्यासाठी या गडाची निर्मिती केली. किल्ला बांधताना काही विघ्न येऊ नये म्हणून पानसे यांनी जेजुरीच्या खंडोबाला साकडे घातले आणि गडावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला, त्यामुळे गडाला मल्हारगड असे नाव दिले असावे. थोरले माधवराव पेशवेही गडावर येऊन गेले होते. तसेच इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्या विरुद्ध बंड करताना उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी गडाचा आश्रय घेतला असेही म्हटले जाते.
पुण्यातून चारपाच तासांमध्ये गड बघून माघारी येऊ शकेल असे छोटेखानी ऐतिहासिक ठिकाण. शिवाय, अर्धा तास ट्रेकिंगची मजाही अनुभवता येईल.
"जय शिवराय"
- ईश्वर त्रिम्बकराव आगम
वडगाव निंबाळकर, बारामती.
+९१ ९७६६९६४३९८

No comments:
Post a Comment